HISTORY ONE DAY NOTES - PDF to Flipbook
Published on Aug 31, 2026
Description:
History
Revision
By
C‘oe Hw$Xio 1
2
3
4
5
6
7
8
9
JìhZ©a OZab ..................................................................................................01
AUwH«$‘{UH$m
15
19
28
34
44
53
57
{~«{Q>e H$mbrZ H$m¶Xo .............................................................................
{ejU ..........................................................................................................................
Ym{‘©H$ gwYmaUm d Midi ..............................................................
gm§àXm{¶Ho$VmMm … dmT> Am{U {dH$mg ................................
g‘mOgwYmaH$m§Ûmao ñÌr gwYmaUm§~m~V à¶ËZ .............
~«m÷UoÎma Midi ........................................................................................
dgmhV emgZH$mbrZ ^maVr¶ AW©ì¶dñWm ...............
H$m‘Jma Midi .......................................................................................... 6210
11
12
13
14
15
16
17
18
a¶Vdmar O{‘Z ‘hgwb ì¶dñWm ............................................. 69
74
77
82
90
100
107
112
AmXrdmgr CR>md ..............................................................................................
eoVH$ar Am§XmobZo ...........................................................................................
1857 Mm nyd© CR>md Am{U 1857 Mm CR>md .............
H«$m§VrH$maH$ Midi .................................................................................
amOH$s¶ g§KQ>Zm§Mm B{Vhmg ..........................................................
amîQ´>r¶ H$m±J«og ...................................................................................................
amîQ´>r¶ Midi 1885 Vo 1947 .............................................
PREDICTIONS................................................................................... 118B{Vhmg - C‘oe Hw$Xio
1
N
O
T
E
S
© 1774 मध्येवॉरनहेस्टिंग भारतातील कंपनीच्या प्रदेशाचापहिला गव्हर्नर जनरल बनला.
© याआधी तो 1772 मध्येबंगालचा गव्हर्नर म्हणून नियुक्त झाला होता.
© त्याने 1772 मध्येकंपनीने दुहेरी शासन व्यवस्था रद्द करून पंचवार्षिक बोली पद्धत
व्यवस्था बंगालमध्येलागूकेली.
© यापद्धतीत सर्वात जास्त बोली बोलणाऱ्यास 5 वर्षांसाठी कर गोळा करण्याचे अधिकार
देण्यात आले.
© 1777 मध्येही पद्धत बंद करून वार्षिक बोली पद्धत लागूकरण्यात आली.
© 1772 मध्येत्याने प्रत्येक जिल्ह्यात 1 दिवाणी व 1 फौजदारी न्यायालय स्थापले.
© दिवाणी न्या. चा प्रमुख कलेक्टर असे, जिल्हा न्यायालयात 500 रु.पर्यंतच्या खटल्यांची
सुनावणी होत असे. त्याच्यावर सदर दिवाणी न्यायालयात अपील करता येत होते.
© या न्यायालयात गव्हर्नर व त्याच्या कौन्सिलचे 2 सदस्य असत. तसेच हिंदुसाठी हिंदू
कायदे व मुस्लिमांसाठी मुस्लिम कायदे वापरले जात.
© जिल्हा फौजदारी न्यायालयात काझी, मुफ्ती व 2 मौलवी हे अधिकारी असत.
© या गव्हर्नर जनरल च्या काळात 1773 चा नियमन कायदा (Regulating Act) ब्रिटीश
संसदेने पारित केला.
© या कायद्यानुसार कंपनीचा संचालक मंडळाची सेवा मुदत वाढवून ती 4 वर्ष करण्यात
आली. तसेच त्या संचालक मंडळातील सदस्य संख्या 24 करण्यात आली.
© भारतासाठी गव्हर्नर जनरल या पदाची निर्मिती करण्यात आली. गव्हर्नर जनरलच्या
मदतीसाठी 4 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.
© भारतासाठी कोलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.
© सर्वोच्च न्यायालयचा न्यायाधीश म्हणून सर एलिझा इम्पे यांची नियुक्त केले.
© या काळात नंदकुमार प्रकरण, चेतसिंग प्रकरण आणि अवध बेगम प्रकरण गाजले.
© निवृत्तीनंतर महाभियोगाचा खटला भरला होता. त्यात त्याची निर्दोष मुक्तता झाली.
हेस्टिंग्जची सांस्कृतिक कार्ये
© विलियम जोन्स व कोलबुक यानी Digest of Hindu Law हे पुस्तक लिहिले.
© वॉरनहेस्टिंग्ज ने Chark Wilkins याने भाषांतरित केलेल्या गीतेला प्रस्तावना लिहिली.
© इ.स. 1784 मध्ये विल्यिम जोन्सने स्थापन केलेल्या "Asiatic Society of Bangal'
या संघटनेचे भारताच्या सांस्कृतिक इतिहासात महत्वाचे स्थान आहे.
पिटचा कायदा (1784)
© या कायद्याने मुंबई व मद्रासच्या गव्हर्नरचे अधिकार कमी केले तसेच गव्हर्नर जनरलचे
बोर्ड ऑफ कंट्रोल हे मंडळ 6 प्रतिनिधीचे करण्यात आले. सर्व व्यवहारासाठी या
(1) वॉरेन हेस्टिंग (1772-1785)
1 JìhZ©a OZabB{Vhmg - C‘oe Hw$Xio
2
N
O
T
E
S
मंडळाची संमती आवश्यक होती.
प्रथम इंग्रज मराठा युद्ध (1775 ते1782)
© सवाई माधवराव व रघुनाथराव यांच्या मांडणात इंग्रजांनी रघुनाथरावांना मदत केल्याने
हे युद्ध आरंभले गेले. 1775 मध्येसुरतच्या तहानुसार या युद्धाची सुरवात झाली तर
1782 च्या सालबाईच्या तहानुसार हे युद्ध समाप्त करण्यात आले.
© कॉर्नवॉलीस भारतात आला (1786) तेव्ह पिटच्या कायद्यामध्येदुरुस्ती करून
कॉर्नवॉलिस याला आणीबाणीच्या काळात सेनापतीचे अधिकार वापरण्याचे तसेच,
काही अत्यावश्यक बाबींमध्येआपल्या परिषदेचा निर्णय दूर सारण्याचा अधिकार
मिळाला.
© जिल्ह्याची संपूर्ण सत्ता कलेक्टरच्या हाती केंद्रित करणे हे कॉर्नवॉलिसचे प्रथम उद्दिष्ट
होते.
© त्याने जिल्हा फौजदारी न्यायालयातील भारतीय न्यायाधीशांची व्यवस्था रद्द करून
त्याऐवजी बंगालसाठी तीन आणि बिहारसाठी एक अशी चार फिरती न्यायालये निर्माण
केली.
© कॉर्नवॉलिस ने कर व न्याय प्रशासनाला विभक्त केले या अधिकार विभाजनाला
'कॉर्नवॉलिस साहिंता' असे म्हणतात.
© यानुसार कलेक्टरचे न्यायालयीन व फौजदारी अधिकार काढून घेण्यात आले व त्याला
केवळ कर संबंधीचे अधिकार देऊन जिल्हा दिवाणी न्यायालयात स्वतंत्र न्यायाधीश
नियुक्त करण्यात आले व त्यांच्याकडे फौजदारी व पोलीस अधिकार देण्यात आले.
© कॉर्नवालीस याने निर्माण केलेली न्यायालयीन रचना यात सर्वात खाली मुनसीफ
न्यायालय असे त्याला 50 रुपये पर्यंतचे खटले चालविण्याचा अधिकार असे. याठिकाणी
भारतीयांची नियुक्त होत असे.
© त्यावर रजिस्ट्रारचे न्यायालय असे. या न्यायालयात 200 रु. पर्यंतचे खटले चालविले
जात. 1000 रु. च्या वरील खटले कोलकत्ता येथील सदर दिवाणी न्यायालयात भरत.
या न्यायालयात गव्हर्नर जनरल व त्याची कौन्सिल हे सदस्य असत.
© 5000 रु. वरील खटले कौन्सिल स्थित सम्राटाकडे भरत असत. त्याने जिल्ह्याचे
क्षेत्रफळ 400 वर्ग मैल निश्चित करुन प्रत्येक जिल्ह्यात 1 दरोगा व त्याचा मदतीसाठी
पोलीस नियुक्त केले.
कायमधारा सुधारणा/जमीनदारी पद्धत ही पद्धत
© 1788 मध्ये निर्माण करण्यात आली.
© प्रथम ती 10 वर्ष असणार होती.
© परंतु1793 मध्येती कायमस्वरूपी केली म्हणून तिला कायमधारा पद्धत म्हणतात. या
पद्धतीनुसार शेतक-यांसोबत जमीनदारामार्फत करार करण्यात आले.
© त्यानुसार जमीनदाराने शेतकऱ्यांची माहिती लेखी स्वरुपात ठेवणे बंधनकारक करण्यात
आले.
(2) कॉर्नवॉलिस (1786-1793)B{Vhmg - C‘oe Hw$Xio
3
N
O
T
E
S
© एकुण करापैकी 8/9 भाग कंपनीला तर 1/9 भाग जमीनदाराला मिळत असे.
© जमिनदार जोपर्यंत कर भरत असे तोपर्यंत जमीनदाराचा जमिनीवरील हक्क कायम असे.
तसेच शेतकऱ्याऱ्यांना अन्यायाविरोधी न्यायालयात दाद मागता येणार होती.
© गव्हर्नर जनरलचे अधिकार व्यापक होण्याच्या दृष्टीने 1793 मध्येचार्टर अॅक्ट पारीत
करण्यात आला.
© त्यानुसार प्रांतिक गव्हर्नर यांची कायदेविषयक तपासणी करण्याचा अधिकार गव्हर्नर
जनरलला मिळाला. तसेच कंपनीला चीनमधून व्यापार करण्याची परवानगी मिळाली.
म्हैसूर युद्धे प्रथम इंग्रज म्हैसुर युद्ध (1767 ते1769) :
© 1769 मध्येपहिल्या इंग्रज म्हैसुर युद्धादरम्यान हैदर अलीने कर्नल स्मिथ यांच्या
नेतृत्वात असणाऱ्या ब्रिटीशांचा पराभव केला.
दुसरेम्हैसुर युद्ध (1780 ते1784) :
© सन 1771 मध्येमराठे व हैदर यांच्यात संघर्ष निर्माण झाला. यामध्येइंग्रजांनीहैदर सोबत
केलेल्या तहानुसार मदत केली नाही. यातून पुढे हैदर व इंग्रज संघर्ष उभा राहिला. इंग्रज
म्हैसुर यांच्या संघर्षात 1782 मध्येकर्करोगाने हैदरचा मृत्यू झाला. त्यानंतर टिपुसुलतान
याने युद्धाची सूत्रे हातात घेतली. 1784 मध्येमंगलोर येथे झालेल्या करारानुसार दोन्ही
पक्षांनी आपाआपले घेतलेले प्रदेश परत करण्याच्या अटीवर युद्ध समाप्त केले.
तिसरेइंग्रज म्हैसुर युद्ध (1790-1792) :
© त्रावणकोरच्या राजाला इंग्रजांनी संरक्षण दिले असता टिपुने या राजावर हल्ला केला.
यावेळी कॉर्नवॉलिस टिपुवर चालून गेला. तसेच मराठ्यांनी इंग्रजांना मदत केली. टिपूने
श्रीरंगपट्टणम या ठिकाणी तह करून युद्ध समाप्त केले. यात टिपुला आपले आर्धेराज्य
गमवावे लागले.
चौथेम्हैसुर युद्ध 1799 :
© 1799 लॉर्ड वेलस्लीच्या कारकिर्दीत चौथे इंग्रज म्हैसुर युद्ध सुरु झाले. यावेळी
श्रीरंगपट्टनम येथे झालेल्या लढाईत टिपुचा मृत्यू झाला. वेलस्लीने टिपुचे पूर्ण राज्य
आपल्या ताब्यात घेतले.
© इ.स. 1793-98 ह्या काळात जॉन शोअर हा गव्हर्नर होता.
© त्याच्यानंतर वेलस्लीला गव्हर्नर बनविण्यात आले.
© लॉर्ड वेलस्लीने तैनाती फौजेची पद्धत लागूकेली.
© या संकल्पनेनुसार ज्या राजांनी तैनाती फौजेचा स्विकार केला,
© त्या राज्यांची संरक्षणाची जबाबदारी कंपनीने घेतली. तसेच त्या संपूर्ण सैन्याचा पूर्ण खर्च
त्या राजाने करावा असे ठरविण्यात येत असे.
© इ.स. 1798 व 1800 मध्येलॉर्ड वेलस्ली ने हैद्राबादच्या निझामाबरोबर तैनाती फौजेचा
तह केला.
© हैद्रबादचा निजाम हा भारतातील पहिला राज्यकर्ता होता ज्याने तैनाती फौज स्वीकारली.
तसेच 1801 मध्येकर्नाटकच्या व आयोध्येच्या नवाबांनी तैनाती फौज स्वीकारली.
(3) लॉर्ड वेलस्ली (1798-1805)B{Vhmg - C‘oe Hw$Xio
4
N
O
T
E
S
© दुसरे इंग्रज मराठा युद्ध 1802: बाजीराव दुसरा याने इंग्रजांसोबत वसईचा तह केला
आणि यानुसार तैनाती फौज स्वीकारली. यामुळे ग्वाल्हेरचे नाराज शिंदे व नागपूरचे भोसले
आणि होळकर या मराठा सरदारांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध सुरु केले ते द्वितीय इंग्रज मराठा
युद्ध म्हणून ओळखले जाते. हे युद्ध 1803 ते 1805 या दरम्यान लढले गेले. 1803
मध्येभोसल्यांनी देवगाव तहानुसार तैनाती फौजेचा स्विकार केला. याच वर्षी शिंदेनी
सुर्जी अंजनगाव या तहानुसार तैनाती फौज स्वीकारली तर 1805 मध्येहोळकरांनी राजपूर
घाटाच्या तहानुसार तैनाती फौजेचा स्विकार केला. यामुळे युद्धालापूर्णविराम मिळाला.
© 1813 च्या चार्टर कायद्यानुसार इंग्लंडच्या संसदेने कंपनीचा भारताच्या व्यापाराचा
एकाधिकार समाप्त केला.
© परंतु चिनचा व्यापार व चहाचा व्यापार कंपनीकडे कायम ठेवण्यात आला तसेच गव्हर्नर
जनरल, गव्हर्नर व भारतातील लष्कराचा सेनापती इ.नेमणूक करतेवेळी इंग्लंड सरकारची
समती घेणे कंपनीला बंधनकारक करण्यात आले.
© या कायद्यानुसार ख्रिस्ती मिशनऱ्यांना भारतात खिस्ती धर्माचा प्रसार-प्रचार करण्याची
संमती दिली.
© तसेच पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार व पाश्चात्य विज्ञानाची ओळख व्हावी या कार्यासाठी
1 लाखाचे अनुदान मंजूर करण्यात आले.
© नेपाळ सोबत युद्ध (1814-1816) : हेस्टिंगला सर्वप्रथम गुरख्यांशी संघर्ष करावा
लागला. 1801 मध्येइंग्रजांनी गोरखपूर व बस्ती हे जिल्हे आपल्या ताब्यात घेतले यामुळे
नेपाळ व इंग्रजांची सीमा परस्परांशी भिडली. यातून संघर्ष उभा राहिला. 1816 मध्ये
इंग्रजांनी गुरख्यांसोबत सगौलीचा तह केला. या तहानुसार गडवाल व कुमाऊ जिल्ह्यांचा
प्रदेश इंग्रजाना देण्यात आला. तसेच काठमांडू येथे ब्रिटीश रेसिडेंट ठेवण्यास गुरख्यांनी
मान्यता दिली.
© पेंडाऱ्याचा बंदोबस्त : मल्हारराव होळकरांनीपेंढारीना 'सोनेरी रंगाचा' ध्वज दिला देऊन
आपल्या सैन्यात भरती केले. चितू सिंग, वासीम मोहम्मद व करीमखान असे तीन पेंढारी
प्रमुख पुढारी होते. हेस्टिंगने पेंढाऱ्याचा पूर्ण पराभव केला. यात त्याने स्वतः या मोहिमेचे
सूत्र हातात घेतले होते.
© तिसरेइंग्रज मराठा युद्ध : हेस्टिंगच्या काळात शेवटचे इंग्रज-मराठा युद्ध लढले गेले.
यात मराठ्यांचा पराभव झाला. पेशवे बाजीराव दुसरा याला 8 लक्ष पेंशेन देण्यात आली.
त्याला कानपूर(बिठूर / ब्रम्हबार्ता) या ठिकाणी राहण्यास परवानगी दिली. याच ठिकाणी
त्याचा 1852 मध्येमृत्यू झाला.
© रयतवारी पद्धत (1820): रिड व थॉमस मन्नरो यांनी मद्रास व मुंबईच्या काही प्रदेशात
कर वसूल करण्यासाठी नवीन पद्धत निर्माण केली. या पद्धतीला रयतवारी पद्धत
म्हणतात.
© महालवारी पद्धत : एलफिस्टनने 1818 नंतर ही पद्धती निर्माण केली यात मॅकेंझी व
बर्ड या अधिकाऱ्यांनी त्याला मदत केली.
© हा रयतवारी आणि जमिदारीचा सुवर्णमध्य होता (परंतुतरीही रयतवारी हीच पद्धत
(4) लॉर्ड हेस्टिंग (1813-1823)B{Vhmg - C‘oe Hw$Xio
5
N
O
T
E
S
सर्वात योग्य पद्धत होती असे मानले जाते).
© एल्फिस्टनने ही पद्धत 1833 मध्येवायव्य प्रांतात (उत्तर प्रदेश), गंगा-यमुनेचा
दुआबाचा प्रदेश तसेच पंजाब आणि मध्यप्रदेशाच्या काही भागात पद्धत लागूकेली.
© ह्या पद्धतीत महसूल वसूल करण्याचा करार संपूर्ण महालाबरोबर करण्यात येत असे.
महालाच्या वतीने महालप्रमुख ह्या करारावर सह्या करत असे.
© ह्याच पद्धतीप्रमाणे अवधमध्ये 'तालुकादारी पद्धत', मध्याप्रदेश मध्ये 'नंबरदारी
पद्धत' आणि पंजाब मध्ये'गाववारी पद्धत' अस्तित्वात होती.
© बेटिंक पासून पुढे सर्व गव्हर्नर जनरल हे भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून ओळखले जाऊ
लागले.
© बेटिंगचेसामाजिक कार्य: राजा राममोहन रॉय या भारतीय समाजसुधारकाच्या विचारांनी
प्रभावित होऊन डिसेंबर 1829 च्या नियमनाद्वारे सतीप्रथेला अवैध घोषित करण्यात
आले.
© तसेच त्याने बालहत्या आणि नरबळी, स्रीभ्रून हत्या, महिलांचा व्यापार, गुलामगिरी
पद्धत, इ. बंद करून कर्नल स्लीमनच्या नेतृत्वात ठगांचा बंदोबस्त केला.
© शिक्षण सुधारणा : इंग्रजी हे शिक्षणाचे माध्यम म्हणून घोषित केले. बेटिंकने मेकॉलेचा
अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. या समितीच्या अहवालात झिरपता
सिद्धांत मांडण्यात आला. तसेच उच्च स्तरावरील प्रशासनाची/शिक्षणाची भाषा इंग्रजी
राहील असे ठरविले.
© 1835 मध्येबेटिंक ने कोलकत्ता येथे मेडिकल कॉलेजची स्थापना केली.
© आर्थिक सुधारणा : बेटिंकने खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने दोन समित्या उभारल्या
तसेच अफूच्या व्यापारासाठीपरवाना आवश्यक करण्यात आला आणि हा व्यापार केवळ
मुंबई बंदरातूनच होईल असे आदेश दिले.
© लोखंड व कोळशाचे उत्पादन, चहा व कॉफी चे मळे तसेच कालवे यासाठी प्रोत्साहन
दिले.
© न्यायालयीन सुधारणा : उपजिल्हाधिकारी / उपन्यायाधिकारी या पदावर भारतीयांची
निवड कारण्याची तरतूद 1833 च्या कायद्याने केली.
© 1833 च्या चार्टर कायद्याद्वारे मुंबई व मद्रास गव्हर्नरचे विधेयक संमत करण्याचे
अधिकार काढून घेण्यात आले.
© पारशी भाषा बंद करून सर्वोच व उच्च न्यायालय आणि प्रशासन या ठिकाणी इंग्रजी
भाषेची सुरवात केली.
© अलाहाबाद याठिकाणी स्वतंत्र सदर दिवाणी न्यायालय व सदर फौजदारी न्यायालय सुरू
केले.
© 1833 चा कायदा : या कायद्याने बंगालच्या गवर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल
म्हंटले जाऊ लागले.
© तसेच कंपनीची चहा व चीनची मक्तेदारी संपृष्टात आणली.
(5) लॉर्ड विलियम बेटिंक
(1828 ते1835)